देवगिरी किल्ल्यावर रन फॉर युनिटी वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता धाव

Foto
माळीवाडा, (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य  सेनानी व देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दि ३१ शुक्रवारी देवगिरी किल्ला परिसरात रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम पोलीस स्टेशन दौलताबाद यांच्या वतीने पार पडला.

कार्यक्रमात दौलताबाद पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शना खाली अधिकारी व कर्मचारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, पोलिस पाटील, पत्रकार, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक अशा सुमारे ८० ते १०० जणांनी सहभाग नोंदविला. 

हम सब एक है एकता ही अखंडता है भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक रेखा लोंढे किल्ला संरक्षण सहाय्यक निलेश कोळी, माजी सरपंत संजय कांजणे, सय्यद हारुन, बाबा भाई माळीवाडा सुप्रभात ग्रुपचे उपसरपंच मनीष गाजरे, नंदकिशोर मुळे, अॅड. नंदकिशोर ढगारे, गणेश आस्वार, छबू पेहरकर, नामदेव जगधने, विश्वास आस्वार, भैय्या बाभळे - पोलिस पाटील प्रमोद साठे, तसेच परिसरातील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किल्लातील  रन फॉर युनिटी कर्मचारी सिताराम धनायक, संजय घूसळे, फकीरचंद गायकवाड, बाबासाहेब आढाव, शंतीलाल दौलत, लक्ष्मण राठोड, रंगनाथ राठोड कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला. 

वेळी पोलीस निरीक्षक आर. डी. लोंढे यांनी सामाजिक एकतेचा संदेश देत सांगितले की, सामाजिक एकता हा विकासाचा मूलमंत्र आहे. यात आपल्या देशाचे हित सामावलेले आहे. पोलीस स्टेशन दौलताबाद हद्दीत सर्वत्र शांतता आहे, असे निरीक्षक लोंढे यांनी सांगितले.